मराठी निबंध

माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh

Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh मित्रांनो , आज मी इथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर निबंध लिहित आहेत. या निबंधाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहेत.

Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh

माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh

“आरोग्य हीच संपत्ती” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. या सुविचाराचे खरे महत्त्व आज लोकांना पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानाची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहेत. या अभियानाद्वारे घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करण्यात येत आहेत. हि मोहीम २ चरणात विभागल्या गेली आहेत, पहिले चरण १५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० तर दुसरे चरण १२ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० .

या अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात दारोदारी जाऊन आरोग्याची विचारपूस तसेच तपासणी करण्यात येत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तरीदेखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. शासनाचे सर्व विभाग या कामाकरिता सक्रिय असून या मोहिमेत नागरिकांनीही स्वतः हून सहभागी होऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी केले.

कोणतेही अभियान व योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा.

या अभियानात आशा वर्कर तसेच मोठे योद्धे सहभागी झाले आहेत. या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन कुणाला ताप येत आहेत का ? कुणाला श्वास घेण्यास त्रास होत आहेत का ? कुणाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहेत का ? अशाप्रकारे आरोग्याची तपासणी करण्यात येत आहेत.

या मोहिमेद्वारे सर्वांची आरोग्य तपासणी युद्ध पातळीवर सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना करणे खूप आवश्यक होते. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात यावे , असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेत.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

About the author

Admin

1 Comment

Leave a Comment

error: Content is protected !!