मराठी सुविचार

आचार्य विनोबा भावे यांचे 15+महान विचार Best Vinoba Bhave Suvichar In Marathi

Vinoba Bhave Suvichar In Marathi विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

Vinoba Bhave Suvichar In Marathi

आचार्य विनोबा भावे यांचे महान विचार Vinoba Bhave Suvichar In Marathi

ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.

 

कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.

 

जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.

 

दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.

 

परीश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.

 

प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.

 

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे.

 

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा

 

यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.

 

विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल

 

विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.

 

सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

About the author

Admin

Leave a Comment

error: Content is protected !!